सोने आणि चांदी दरात पुन्हा मोठी वाढ ; आताचे दर तपासून घ्या
मुंबई । एक लाखाचा टप्पा पार केलेल्या सोने दरात घसरण झाली आहे. यामुळे सोन्याच्या दराने निच्चांकी गाठल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता सोन्याचा दर पुन्हा वाढू लागला आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल १००० रूपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
आज बुधवार, २ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. प्रमुख शहरांतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात उच्चांकी पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर सध्या ९८,५०० रूपये, तर २२ कॅरेट सोनं ९०,३०० रूपये प्रति १० ग्रॅम इतकं आहे. तर, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा दर १,१०,७०० रूपये आहे. आज चांदी ३००० रूपयांनी महागली आहे.


चांदीच्या दरातही वाढ
सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव १,१०,७०० रूपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ३००० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला झळाली बसली आहे.
देशात सोन्याचे दर कसे ठरवले जातात?
भारतात सोन्याची किंमत दररोज बदलते. कारण ती अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की, जागतिक सोन्याचा दर, डॉलर आणि रूपयाच्या किमतीत फरक. तसेच सरकार किती कर आकारात आहे, यावरही सोन्याचे दर ठरवले जातात.