जळगावच्या सुवर्णनगरीत सोने दरात मोठी घसरण

0

जळगाव । भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मागच्य काही दिवसात सोने दरात मोठी उसळी दिसून आली. गेल्या आठवड्यात सोन्याचा तोळा पुन्हा लाखाच्यावर गेल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र भारत पाकिस्तान युद्धविरामानंतर व अमेरिका चीन यांच्यात झालेल्या व्यापार कराराचा सोन्या भावावर परिणाम झाल्याचं दिसत आहे. सोमवारी सोने दरात मोठी घसरण झाली आहे.

जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटीसह सोन्याचे भाव ९७ हजार रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव १ लाखांवर स्थिर झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या चांदीच्या दरात अचानक वाढ आणि घट सुरू असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. मात्र लग्नसराईमध्ये सोन्याचे दर घसरत असल्याने त्याचा दिलासा ग्राहकांना मिळत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम सोने बाजारावर झाला आहे. सोन्याचा भाव हा १ लाख ९७० पर्यंत गेला होता. मात्र काही दिवसात शेअर बाजार खाली घसरल्याने सोन्याचा भाव देखील एक हजार रुपयाने घसरण झाली आहे. आजचा सोन्याचा भाव जीएसटीसह ९७ हजार रुपये प्रति तोळाइतका झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.