ऐन सणासुदीत सोने-चांदी दरात मोठी वाढ, पहा आजचे दर
जळगाव । उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होणार असून मात्र त्यापूर्वी सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करावी की नाही असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण झाला आहे.
सोने चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून ७५ हजारांपेक्षा जास्त आहेत. आज तर सोन्याचे भाव ७७४५० रुपये प्रति तोळा आहे. सोन्यासह चांदीच्याही किंमती वाढताना दिसत आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत
१० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,४५० रुपये आहे. काल १ तोळ्याची किंमत ७६,९१० रुपये होती. आज सोन्याच्या किंमतीत जवळपास ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६१,९६० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,७४,५०० रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत
आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ७१,००० रुपये प्रति तोळा आहे. काल २२ कॅरेट सोन्याची किंमत ७०,५०० रुपये होती. सोन्याच्या किंमतीत ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५६,८०० रुपये आहे.
१८ ग्रॅम सोन्याची किंमत
आज सोने ५८,०९० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४६,४७२ रुपये आहे. या किंमतीतदेखील ४१० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीच्या किंमती
आज ८ ग्रॅम चांदी ७६० रुपयांना विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९५० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,५०० रुपये आहे. चांदीच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सोने-चांदीच्या किंमती एकसारख्या आहेत.