जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने गाठला 88 हजाराचा टप्पा
जळगाव | ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले असून जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीच्या दराने विक्रमी उंचांकी गाठली आहे. सराफ बाजाराच्या इतिहासात सोन्याचे विक्रमी दर पाहायला मिळत आहे.
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटी सह 88 हजार 475 रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर जीएसटीसह 99 हजार 910 रुपयांवर पोहोचले आहे. आधी कमी दरात सोने चांदी खरेदी केलेल्या ग्राहकांना चांगला परतावा मिळत असल्यामुळे सराफा बाजारात सोनं चांदी मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीचे आजचे दर हे आतापर्यंतचे बाजाराच्या इतिहासातले विक्रमी दर असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
युद्धाचा तणाव, राष्ट्राध्यक्ष यांचे नवीन धोरण, फेडरल बँकेने कायम ठेवलेले व्याजदर, रुपयाचे मूल्य कोसळले आहे. ही सोन्याने चांदीचे दर वाढण्या मागची कारणं आहेत. सोन्याचे दर 90 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर तर चांदीचे दर हे एक लाखांच्या उंबरठ्यावर आहेत.
लवकरच नवीन विक्रम
सोना चांदीच्या विक्रमी दरामुळे सोन्या चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेली असून सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या सर्व कारणांमुळे सोन्या चांदीच्या दराने विक्रम केल्याचा दावा सराफा व्यावसायिकांनी केला आहे. सोन्याचा दर 90 हजारांचा चांदीचे दर एक लाखांचा आकडा पार करेल अशी शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.