सुवर्णनगरीत सोनं १ लाखांच्या उंबरठ्यावर, एका दिवसांत २,६०० रुपयांची वाढ

0

जळगाव । मागच्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. जळगावात गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. यातच शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ झाली असून यामुळे सोन्याचा दर नवीन उच्चांकावर पोहोचला आहे.

जळगावात एकाच दिवसात २६०० रुपयांनी वाढ झाली आहे.त्यामुळे सोने ९९८०० रुपयांवर येऊन पोहचले आहेत. सोन्याचे भाव उच्चांकीवर पोहचले आहेत.सोन्याच्या भावात वाढ झाली असली तर सोन्याच्या दरात मात्र घसरण होत आहे. चांदीचे भाव एक लाख सहा हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.

१२ जून रोजी सोन्याच्या भाव ७०० रुपयांच्या वाढीसह ९७२०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. १३ जून रोजी सकाळी हे भाव थेट २००० रुपयांनी वाढले. संध्याकाळी ते ६०० रुपयांनी वाढले.त्यानंतर सोन्याचे भाव वाढतच आहेत. यापूर्वी २२ एप्रिल रोजी सोने ९९००० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर भाव कमी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून हे भाव ९६००० ते ९७००० दरम्यान होते. परंतु आता हे भाव एक लाखांच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.

सोन्याची गुंतवणूक फायद्याची
सोने खरेदी करणे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये. त्यात सोन्याचे भाव कधीही १ लाखांपेक्षा जास्त होऊ शकतात. जर सोन्याचे दर वाढले तर ग्राहक सोने खरेदीकडे पाठ फिरवतील. आताच सोने खरेदीचे दर कमी झाले आहेत. परंतु सोने ही एक गुंतवणूक आहे. तुम्हाला भविष्यात सोने खरेदी करुन फायदाच होणार आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळेच तुम्ही सोन्याचे भाव उतरल्यावर तुम्ही खरेदी करा. जेणेकरुन तुम्हाला फायदा होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.