सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; ग्राहकांसाठी खरेदीची संधी

0

सोने खरेदी करण्याचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी स्वस्तात सोने खरेदीची संधी मिळत आहे.

जागतिक बाजारात होणाऱ्या हालचाली आणि डॉलरच्या दरातील बदल यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर आज पुन्हा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किंमतीतील ही घसरण लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करण्याची उत्तम संधी ठरू शकते.

सोन्याचा भाव आज, मंगळवार, 12 नोव्हेंबर रोजी कमी झाला आहे. BankBazaar.com अनुसार सोमवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 550 रुपयांपर्यंत घट झाली आहे. देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 76,700 रुपये असून, 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,100 रुपयांच्या स्तरावर आहे.

24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर आणि आजचा दर
मुंबई- 76,760 रुपये
पुणे – 76,760 रुपये
नागपूर – 76,760 रुपये
कोल्हापूर- 76,760 रुपये
जळगाव – 76,760 रुपये
ठाणे – 76,760 रुपये
वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Leave A Reply

Your email address will not be published.