मग आम्हालाही मार्ग मोकळा” – गिरीश महाजनांचा अजित पवारांना टोला

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह काही माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश घेत आहे. मात्र यावरून भाजप नेते ना. गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावत नाराजी व्यक्त केली.

“महायुती म्हणून काही प्रोटोकॉल ठरलेले होते. जे आमच्या विरोधात लढले, त्यांना युतीत घेऊ नये, असं ठरलेलं आहे. मात्र अजित पवारांनी तसा विचार केला नाही. त्यांनी विरोधात लढलेल्यांनाही पक्षात घेतले आहे. त्यामुळे काही ठिकाणी आम्हालाही आता मार्ग मोकळा झाला आहे.”

महाजन पुढे म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. पण अजित पवारांनी कोणाशीही सल्लामसलत न करता त्यांना प्रवेश दिला आहे. आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक असलेल्यांशी चर्चा सुरू होती. मात्र गुलाबराव पाटील यांच्या नकारामुळे आम्ही त्यांना घेतले नाही.”

“लाडक्या बहिणीसाठी निधी वळवण्यात येतोय” या चर्चेबाबत महाजन म्हणाले, “असे कोणतेही पैसे वळवले गेलेले नाहीत. आमच्याकडे पुरेसा निधी आहे. सर्व योजनांचे योग्य नियोजन झाले आहे. कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही. सर्वांना वेळेवर निधी दिला जाईल.”अजित पवार मुख्यमंत्री होतील का, या प्रश्नावर त्यांनी म्हणाले, “सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हावं वाटतं. आपण अनेकदा बॅनर पाहिले आहेत – कोणी पंतप्रधान, कोणी मुख्यमंत्री व्हावे अशी आशा व्यक्त करतं. पण निर्णय घेणारे राऊत कोण आहेत?”

Leave A Reply

Your email address will not be published.