चला रक्ताचे नाते जोडू या ; घाणेकर मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0

मुंबई । बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या भरत घाणेकर मित्र मंडळातर्फे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील मोठ्या मंडपात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 151 पिशव्या रक्त संकलीत झाले.164 रक्तदाते या शिबिरास आले, त्यापैकी काही रक्त दाते विविध वैद्यकीय कारणाने रद्द झाले व 151 रक्त दात्यांनी यशस्वी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विधानपरिषदेतील भाजप गटनेते श्री प्रवीण दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पश्चिम उपनगर उपशहर अध्यक्ष कुणाल माईणकर, उत्तर मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष गणेश खणकर, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी शिबिरास भेट दिली व रक्तदात्यांचा सन्मान केला कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार प्रवीण वराडकर, सामाजिक कार्यकर्ते शाम कदम, संदेश कोलापते, तमन क्यासाराम हे उपस्थित होते.

बोरीवली रक्त पेढीच्या जनसंपर्क अधीकारी अलका सुर्वे त्यांचे सहकारी यांनी रक्त संकलनाचे नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मीकांत नाईक, नरेंद्र माली, वरुण घाणेकर, अशोक पढियार, सिद्धेश्वर वाघचौरे, संजय घाडगे, रमेश घाणेकर, अंकुर चौधरी, हरिश्चंद्र कातवणकर, प्रदीप फणसेकर, दिपेश कामत, अवधूत जाधव, अमित मोहिते, स्वप्निल मोहिते, कैलास माली, कृष्णा शेट्टी, ओमकार कणसे, गोजिरी घाणेकर, शितल घाणेकर, गायत्री नाईक हृदया घाणेकर, चार्वि कदम, ध्रुव माली यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.