एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; 61 गॅस सिलेंडर चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत
आरोपीच्या चौकशीत त्याने साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून सर्व 61 सिलेंडर तसेच गुन्ह्यात वापरलेले सुमारे 5 लाख रुपये किमतीचे आयशर वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस अधिकारी राहुल तायडे, चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, गणेश शिरसाळे, प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, प्रमोद, किरण चौधरी, नितीन ठाकुर, किरण पाटील आणि शशिकांत मराठे यांनी सहभाग घेतला.