गडचिरोलीतील ग्रंथोत्सवात कवी गजानन गेडाम यांचा सन्मान
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोली तथा जि. प. शिक्षण विभाग (माध्य.) गडचिरोलीच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात १३ व १४ फेब्रुवारी रोजी गडचिरोली ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमातील सहाव्या सत्रात आयोजित कविसमेलनात कवी गजानन गेडाम यांनी “आठवणी” ही कविता सादर केली होती..
यावेळी अध्यक्षस्थानी नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे तर बक्षीस वितरक म्हणून शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी (माध्य.) अमरसिंग गेडाम, ग्रामगीताचार्य तथा ज्येष्ठ विचारवंत बंडोपंत बोढेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु. श्री. गजभारे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जगदीश म्हस्के, पं.स. चे गटविकास अधिकारी गोंगल, डायटचे प्राचार्य बळीराम चौरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी झाडी बोली साहित्य मंच चे सर्व कवी सहभागी होत झाडीचा महिमा वर्णन केला. या संमेलनात कवी गजानन गेडाम देखील निमंत्रित कवी होते असून त्यांच्या कवितेचा आणि दर्जेदार सादरीकरणास्तव यांचा प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन झाडीबोलीचे गडचिरोली चे सचिव कवी संजीव बोरकर व कवयित्री यामिनी मडावी यांनी केले तर आभार चेतन ठाकरे यांनी मानले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते.या वेळी आयोजक तथा पाहुण्यांनी सादर कवितांचे संग्रह काढण्याचा मानस वर्तविला.