गजानन गेडाम यांना जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित

0

जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी आधिकारी गडचिरोली श्री. सुहास गाडे साहेब यांच्या हस्ते दिला.

जगातील पहिली अधिपरिचारिका, आद्य परिचर्येच्या जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिना निमित्य परिचर्या क्षेत्रात उल्लेखनीय सुश्रुषा सेवा करणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाइटिंगले पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. असेच गडचिरोली जिल्ह्यात परिचर्या क्षेत्रात २०१३ पासून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, ज़िल्हा परिषद गडचिरोली तर्फे जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार सोहळ्यात जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे अधिपरिचारिका पुरुष या पदावर कार्यरत श्री गजानन भिकाजी गेडाम यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे होते तर मंचावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमित साळवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सचिन हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली चे वैद्यकीय अधीक्षक डॉ पेंदाम, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ हुलके, सहाय्यक अधिसेविका आशा बावणे आदी उपस्थित होते. सर्वत्र गजानन गेडाम यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.