समाजसेवक कवी गजानन गेडाम यांच्या कवितेचा वरोरा येथे सन्मान

0

गडचिरोली । झाडीबोली साहित्य मंडळ साकोली द्वारा आयोजित झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोराच्या रौप्य महोत्सव पर्वावर वरोरा येथील कटारिया सभागृहात ३२ वे झाडीबोली साहित्य संमेलन दिनांक २८ व २९ डिसेम्बर २०२४ रोजी आयोजित केलेले होते. या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून नागपूर चे प्रसिद्ध गझलकार व साहित्यिक मा. लोकरामजी शेंडे हे होते.

तर उदघाटक म्हणून खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले तसेच झाडीबोली चे महर्षी मा. हरिश्चंद्र बोरकर, झाडीच्या बहिणाबाई अंजनाताई खुणे आदी उपस्थित होते.या संमेलनातील काव्य संमेलनात गडचिरोली, चंद्रपूर, भांडारा,गोंदिया सह विदर्भातील कवी कवयित्रीनी सहभाग घेतला होता.

या कविसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून गडचिरोलीतील झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे सदस्य, समाजसेवक,जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे आधीपारीचरिका पुरुष म्हणून कार्यरत कवी गजानन गेडाम यांनी.. झाडीबोलीतील “दादा तुई योजना” ही स्वरचित कविता सादर केली. या कवितेला भरभरून सर्व प्रेक्षकांनी दाद दिली त्याबद्दल संमेलनध्यक्ष. मा लोकराम शेंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, व जेष्ठ साहित्यिक मा. ना.गो. थुटे यांचे पुस्तक. देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वत्र त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.