बिबट्याच्या हल्ल्ह्यात वनसंरक्षकांसह, ग्रामस्थ जखमी
बिबट्याला पकडण्यासाठी नाशिकची टीम घटनास्थळी दाखल
इगतपुरी : प्रतिनिधी भागीरथ आतकरी
इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका अकरा वर्षे युवकावरती बिबट्याचा हल्ल्याची घटना घडली होती. शुक्रवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असतांना या पिसाळलेला नरभक्षक बिबट्याने या परिसरात रेस्क्यू सुरू असताना पिसाळलेल्या बिबट्याने पाच ते सहा वनरक्षकांवरती हल्ला केला आहे. या हल्ल्यात १) कार्तिक मोहन सारूक्ते वय २५ वर्षे रा. उंबरकोन ता. इगतपुरी. २) सतीश विष्णू सारूक्ते ,३७ वर्षे रा. उंबरकोन ३) किसन गोविंद सारूक्ते ४५ वर्षे रा. उंबरकोन , ४)यश खंडू बोराडे १८ वर्षे,रा. दौंडत, ५) श्रावण भीमा चिमटे वय २५ वर्षे, ६) राजाराम रामदास शिंदे ३१ वर्षे उंबरकोन, यांच्यासह १) फैज अली जाफर अली सय्यद वय ३० वर्षे २) भाऊसाहेब गणपत राव ५१ वर्षे ३) गोरख देवराम बागुल ४९ वर्षे ४)विठ्ठल पुंडलिक गावंडे ५१ वर्षे ५)चिंतामण देवराम गाडर ३३ वर्षे ६)कैलास लक्ष्मण पोटींदे ३४ वर्षे या सर्व जखमींवर घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. अविनाश गोरे, डॉ. संजना गायकर, यांच्यासह शितल पाटील, दिपक कुलकर्णी,
दीपा कुलकर्णी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात आमदार हिरामण खोसकर व आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी भेट देऊन जखमींची विचापुस केली. या हल्ल्यात जवळपास १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे बिबट्याच्या हल्ल्यात ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला होता. यावेळी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण सारुक्ते असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. प्रवीण सारुक्ते हा आपल्या घरापासून दोनशे मिटर अंतरावर असलेल्या शेतात आई वडिलांबरोबर गेला असता उसाच्या शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. आई वडिलांनी आरडा ओरडा करून बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचविले. मात्र जाता जाता बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण गंभीर जखमी असून त्याला घोटी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी सकाळी रेस्कु ऑपरेशन राबवण्यात आले. मात्र बिबट्याला पकडत असतांना घटनास्थळी दोनशे ते तीनशे ग्रामस्थांनी गर्दी केल्यामुळे या नरभक्षक बिबट्याने वनरक्षकांच्या पाच कर्मचाऱ्यांसह पाच ग्रामस्थांवर हल्ला करीत जखमी केले होते. अखेर या बिबट्याला पकडण्यासाठी नाशिक येथील डार्ट टीमला पाचारण करण्यात आले आहे. या कोम्बींग ऑपरेशन शोधमोहीमेत नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, पश्चिम भाग नाशिक, सहा. वनसंरक्षक ( रोहयो व वन्यजीव ) अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर येथील जवळपास १३० अधिकारी व वन कर्मचारी सहभागी झाले होते. सायंकाळी ऊशीरा पर्यंत बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते.
फोटो – बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह प्रविण सारुक्ते तसेच घटनास्थळी झालेली गर्दी