महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

0

पुणे | राज्यात सध्या कडक उन्हाळ्याचा तडाखा सुरू असतानाच हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट :
राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा गाठलेला असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून संबंधित यंत्रणांनी उपाययोजना ठेवाव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान विभागाने) दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह नाशिक जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.