जळगाव MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग

0

जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.आग विझवण्यासाठी जळगाव महानगरपालिका अग्निशमन बंबाचे शर्तीचे प्रयत्न सुरू

आर्यावर्त प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज शुक्रवारी सकाळीच्या सुमारास ही आग लागलीये. आग इतकी भीषण आहे की आगीचे लोड हे दोन ते तीन किलोमीटर वरून नागरिकांना दिसत असून या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी आग कशी लागली याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही तरी जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.