वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित भन्नाट रिल्स स्पर्धेचे रियान अकबाने व साहिल गुरव ठरले विजेते
आगळ्या – वेगळ्या स्पर्धेचे मान्यवरांनी केले कौतुक; बक्षीस वितरण समारंभाला स्पर्धकांनी दिली उत्स्फूर्त दाद
चिपळूण (ओंकार रेळेकर)- शिट्यांचा आवाज,,, टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष करीत वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित भन्नाट रील पारितोषिक वितरण समारंभाला रिल्स स्पर्धकांनी उत्स्फूर्त दाद दिली. तर रिल्समुळे गंभीर वातावरण देखील उपस्थितीतांना अनुभवास मिळाले. छोट्या गटात रियान अकबाने तर मोठ्या गटात साहिल गुरव या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह आकर्षक सन्मानचिन्ह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. या आगळ्या- वेगळ्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे असलेले सुप्रसिद्ध अभिनेते शंतनु मोघे यांच्यासह अन्य मान्यवरांनी कौतुक केले.
वाशिष्ठीचे कोकणातील प्रत्येक माणसाशी अतूट नातं आहे, हे नातं विस्तारु या चला, वाशिष्ठीबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हालाही जाणून घ्यायचं आहे. या अंतर्गत वाशिष्ठी डेअरी-शेतक-यांची स्वप्नसिद्धी, वाशिष्ठी डेअरी कोकणात समृद्धीचा मार्ग, भत्राट रील बनवा-वाशिष्ठी डेअरी प्रॉडक्ट्स सोबत आणि प्रशांत यादव यांनी कोकणात निर्माण केलेली पहिली दुग्ध क्रांती असे या रिल्स स्पर्धेतील विषय होते.या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच चिपळूण बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या सहकार भवन येथे उत्साहीपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, व्हाईस चेअरमन अशोक साबळे, तसेच सर्व संचालक, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, प्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे, प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक राजन बने, सुप्रसिद्ध स्तंभ लेखक पराग वडके, कोकणातील सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर संदेश फडकले आदी उपस्थित होते.या स्पर्धेला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून रिल्स वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये ९० नॉमिनेशन आले होते.यातून छोट्या गटात प्रथम क्रमांक रियान अकबाने, द्वितीय क्रमांक सानिका मयेकर, तृतीय क्रमांक गार्गी कदम तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक साहिल गुरव, द्वितीय क्रमांक अहमद खतीब तर तृतीय क्रमांक विभागून वेदांत पवार आणि प्रद्युम्न देवधर यांना देण्यात आला. या सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांचे असते रोग रकमेसह आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
तर टॉप टेनमध्ये सिद्धार्थ कोळवणकर, उदय करंजकर, वेदांत शितप, सतीश लिंगायत, रोशन आंग्रे, सागर शिरकर, अपूर्वा शिर्के, निखिल सकपाळ, आकाश गुप्ता, अवधूत उतेकर यश मिळवले. या टॉप टेन विजेत्यांसह सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शॉर्टफिल्म मध्ये विजेता निसार शेख तर उपविजेता अनिल फाळके ठरला यांचा देखील गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण प्रसंगी स्पर्धकांसह उपस्थित व मान्यवरांमध्ये जल्लोष दिसून आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी तुम्हां सर्वांची साथ हवी-सुभाषराव चव्हाण
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतात वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित भन्नाट रिल्स स्पर्धा ही आगळी-वेगळी स्पर्धा होती. कोकणात डेअरी प्रकल्प व्हावा, हे आपले ४०-५० वर्षांपासून स्वप्न होते. ते स्वप्न वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून साकार झाल्याचे समाधान आहे. आपली जी रोजगाराची जी गरज आहे, ती संधी- व्यवस्था वाशिष्ठीच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पाचे नाव होत आहे. पुढील काळात या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी तुमची सर्वांची साथ मिळावी, अशी अपेक्षा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.