फैजपूर पालिकेच्या प्रशासकीय काळात सर्व काही वाऱ्यावर!

"घनकचरा ठेकेदार व आरोग्य अधिकारी,मुख्याधिकारी यांची मनमानी"

0

फैजपूर प्रतिनिधी | येथील नगरपरिषद प्रशासकीय राजवाट आल्यापासून शासनाचे स्वच्छाता अभियानाची अंमलबजावणी फक्त कागदावरच राबविली जात असून,शहरात जमीनीवर याचे तिन तेरा झालेले दिसून येते.साफसफाई, पाणीपुरवठा,स्ट्रीट लाईट,यासह अत्यावश्यक मुलभूत सुविधा शहरवासीयांना पुरविण्यात अयशस्वी कामगिरी या पालिका प्रशासनातील संबंधित मुख्याधिकारी,आरोग्य अधिकारी,पाणीपुरवठा विभागाकडून सतत सोयीस्कर दुर्लक्ष केले जात होते व आहे.

याबाबत समस्या ग्रस्थ शहरवासी सह माजी नगराध्यक्ष,सर्वपक्षीय नगरसेवकांनी दि.२८ मे रोजी फैजपूर नगरपरिषद समोर ३ तास ठिय्या आंदोलन केला.तरी याठिकाणी आमदार शिरीष चौधरी देखील उपस्थित असताना प्र.मुख्याधिकारी भुषण वर्मा सह न.पा.प्रशासकीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या समक्ष सदरील पालिकेच्या मनमानी कारभाराचा पाढाच समस्या ग्रस्थांनी मांडला व लेखी तक्रार सुद्धा सादर केली.यावेळी सर्व काही समस्यांचे निवारण ३ दिवसात केले जाईल.तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांनी दिले होते.मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थे सारखीच दिसून येते.

सध्या येथील घनकचरा प्रकल्पावरती ओला-सुखा कचऱ्यांचे शिखर लागल्याने विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण ठप्प असून,सदरील कचऱ्यांचे ढिग जाळले जात आहे.तसेच शहरातील नियोजन शुन्य पध्दतीने कचऱ्याची उचल करून प्रकल्पावरती न नेता परस्पर तो कचरा मनमानी पद्धतीने शहरा बाहेरील शेतामध्ये व विहीरीत संबंधित घनकचरा ठेकेदार सह्याद्री कंट्रकशन नाशिक व पालिकेतील अधिकारी यांच्या संगनमताने थेट पालिका मालकीच्या वाहनांद्वारे टाकण्यात येत आहे.तरी याकडे प्रशासकीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी फैजपूर सह जिल्हाधिकारी जळगाव यांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तसेच याबाबत जिल्हाधिकारी जळगाव सह शासनाच्या संबंधित विषेश विभाग मुंबई यांच्याकडे काही सुज्ञ नागरिकांकडून पुराव्यानिशी लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.