नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रांत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन;नागरिकांचा तीव्र रोष
सात दिवसांत नागरी समस्या मार्गी लावण्याचा आ शिरिष दादा चौधरींचा अल्टीमेंटम
फैजपूर (प्रतिनिधी) : फैजपूर-यावल नगर परिषद मध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासह आरोग्य विभाग,पाणीपुरवठा, वीज पुरवठा,दिवाबत्ती तसेच नागरिकांच्या अत्यावश्यक सुविधांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीसह नागरिकांनी फैजपूर उप विभागीय दंडअधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर दिनांक १२ / ०९ / २०२४ / गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता ठिय्या आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी आमदार व प्रांताधिकारी / प्रशासक यांच्याकडे समस्यांचा पाढाच वाचला.या आंदोलनाचे नेतृत्व रावेर यावल विधानसभा मतदारसंघा चे लोक प्रिय आमदार शिरिष दादा चौधरी यांनी केले
यावेळी महायुती सरकारचा निषेध करत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याची जोरदार मागणी केली.यावेळी फैजपूर उप विभागीय दंड अधिकारी प्रांताधिकारी / तथा प्रशासक मा बबनराव काकडे यांनी आंदोलकांची भेट घेतली यावेळी आमदार शिरिष दादा चौधरी यांनी दीर्घकाळ या ठिकाणी जबाबदार अधिकारी नसल्याने फैजपूर येथे पाणी पुरवठा,आरोग्य वीज पुरवठा,दिवाबत्ती तसेच नागरिकांच्या अत्यावश्यक सुविधांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.नागरी सुविधांची समस्यां दिवसेंदिवस वाढतच आहे.फैजपूर ला प्रत्येक्षात कामे होत नाही आणि परस्पर बील काढले जात आहे.एक प्रकारे अफहार असल्याचा आरोप आमदार चौधरी यांनी केला.तसेच नागरिकांनी देखील आपापल्या भागातील नागरिक समस्यांचा पाढा वाचत नियमित साफसफाई होत नाही, अनेक भागातील ट्रीट लाईट बंद आहे. रस्त्यांची गटारींची दुरुस्ती होत नाही.नियमित फवारणी होत नसल्याने डेंगू चे मच्छरांचा व डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे.पालिकेत समस्यां सोडवण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.लेखी अर्ज देवून सुध्दा समस्या मार्गी लागत नसल्याचा तीव्र रोष नागरिकांनी व्यक्त केला.व फैजपूर पालिकेच्या सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून समस्या मार्गी लावण्याची जोरदार मागणी केली.यावर प्रांताधिकारी / प्रशासक यांनी त्यांच्या दालनात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या बांधकाम, वीज,आणि आरोग्य विभागा विषयी नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला.समस्या निवारण का होत नाही अशी प्रांताधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. यावेळी एकही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने
वेळोवेळी तक्रार करून सुध्दा नागरिकांच्या तक्रारींचे निवारण झाले नाही.आता येत्या दोन दिवसांत आरोग्य विभाग,पाणीपुरवठा,वीज पुरवठा,दिवाबत्ती समस्या मार्गी लावाव्या आणि आपण स्वतःस्वतःलक्ष घालणार असल्याचे प्रांताधिकारी यांनी या अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले. दरम्यान आमदार शिरिष चौधरी यांनी या सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.या आधी सुध्दा नागरिकांचा रोष वाढल्याने नागरिकांसह पालिकेच्या आजी माजी पदाधिकारी यांना आंदोलन करावे लागले.यानंतरही परिस्थिती सुधारली नाही.पुन्हा नागरिकांना आंदोलन करावे लागले.यानंतर येत्या सात दिवसांत नागरिकांच्या समस्या मार्गी न लागल्यास नागरिक आपापल्या घरचा कचरा व तुंबलेल्या गटारींमधील पाणी नगर परिषदेत आणतील असा तीव्र इशारा यावेळी त्यांनी दिला व येत्या सात दिवसांत आरोग्य विभाग,पाणीपुरवठा,वीज पुरवठा,दिवाबत्तीसमस्या मार्गी लावण्याचा अल्टीमेंटम दिला.ठिय्या आंदोलनात आमदार शिरिष दादा चौधरी,माजी उपनगराध्यक्ष कलिम खां मण्यार,शेख कुर्बान,जी पी पाटील,माजी नगरसेवक शेख जफर,महेबूब पिंजारी,अमोल निबाळे,रशिद तडवी, भास्कर सोनवणे,काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज गणेश गुरव,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वसीम तडवी,काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख आसिफ मॅक्निकल,मुदस्सर नजर,शेख वसीम जनाब,शेख फारूक अब्दुल्ला,एम पी जे शहराध्यक्ष शेख रहिमोद्दीन,शेख इरफान,शेख नईम,शेख अन्सार,शिवसेना तालुका प्रमुख अप्पा चौधरी,अशोक भालेराव, साजीद शेख हमीद रमेश चौधरी,भागवत पाटील,सादिक शेख हसन, साबुद्दीम सर, सईद मिस्त्री दरम्यान यावेळी पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे, योगेश सोनवणे,समीर तडवी,शाकिर मलिक,शेख फारूक मण्यार युनूस पिंजारी या पत्रकारांनी चर्चेत सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क
फैजपूर नगर परिषदेचा पदभार सावदा पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या कडे आहे. ते आठवड्यातून एक दिवस सुद्धा फैजपूर पालिकेत येतनाही. नागरिकांची कामे सुरळीत होण्या ऐवजी नागरी कामांचा खोळंबा होत आहे.त्यांच्याकडून तात्काळ पदभार काढून घ्या आणि या ठिकाणी त्वरित पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करा असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना संपर्क करून सांगितले.
“मुरूमचा विषय यावेळी चांगलाच गाजला.”
शहरात टाकण्यात आलेल्या मुरूमचा विषय यावेळी चांगलाच गाजला.पालिका फंडातून पावसाळ्यात मुरूम टाकण्यात येते.मात्र नागरींकांनी आ शिरिष चौधरी यांच्याकडे मागणी केल्याने फैजपूर शहरात विविध भागांमध्ये मुरूम टाकण्यात येत आहे.त्यातच पालिके कडूनही ७० ते ८० डंपर मुरूम शहरात टाकण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचा विषय यावेळी समोर आला यावेळी शहरात पालिकेकडून टाकण्यात आलेल्या मुरूमची माहिती आ शिरिष चौधरी यांनी मागितली.त्यामुळे शहरात टाकण्यात आलेल्या मुरूमचा विषय यावेळी चांगलाच गाजला.
कुशल व अकुशल टेंडर प्रक्रिया दोन महिन्यापासून थंड बस्त्यात टेंडर ओपन करण्यास मुख्याधिकारी याची टाळाटाळ का?
मागील ठेकेदार याला मुदत वाढ का देण्यात आली याबाबत मुख्याधिकारी याचे काय गौड बंगाल याबाबत खुलासा करावा तसेच कुशल व अकुशल टेंडर ओपन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी या विषयावर कर्मचारी यांचे हक्काचे पैसे घेणारा व त्याचे हक्काचे पगार यावर डल्ला मारणारा फैजपूर तो म्होरक्या कौन? याबाबत खुलासा करावा अशी मागणी यावेळी माजी उपनगराध्यक्ष शेख कूर्बान यांनी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे केली.