फैजपूर गुटखा प्रकरणी मुख्य सुत्रधार अजूनही मोकाटच?
सावदा प्रतिनिधी | फरीद शेख |
एकीकडे वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी जळगाव जिल्ह्यास लाभलेले कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिवंत काडतुससह गावठी कट्टे बाळगणारे,पैशांची बॅग व सोन्याचे दागिने लांबविणारे ठग,ट्रक सह २ व ४ चाकी महागडी वाहने कमी दरात विक्री करणारे,रस्ता लूट करणारे,मोबाईल चोरटे,गांजासह गुटखा तस्करी करणारे,डिझेल सह इतर महागड्या वस्तू चोरी करणारे, असे विविध प्रकारचे सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून जेरबंद केल्याची धडाकेबाज कौतुकास्पद कामगिरी केल्या बाबतचे वृत्त येत असताना,दुसरीकडे उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नापुर्णासिंग यांच्या अधिनस्त अलेले फैजपुर पोलीस ठाण्यात परस्पर गुटखा विक्री केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार बऱ्हाटे हवालदार व होमगार्ड इंगळे हे अजूनही मोकाट सुटलेले असून जणू काहीच झाले नाही व आमचा या गुटखा प्रकरणी काहीही एक संबंध नाही.या अविर्भावात हे दोघे आजही वागत असून,सदर प्रकरणी सपोनि निलेश वाघ यांची तडकाफडकी जळगाव नियंत्रण कक्षात बदली कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केली असून,या गुटखा प्रकरणातील मुख्यसूत्रधार मुकाट सुटल्याने,याबाबत प्रामाणिकपणे कार्य करणारे पोलीस कर्मचारी सह जनता मध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली व मिळाली असता सदरच्या गुटखा प्रकरणातील मुख्यसूत्रधार बऱ्हाटे हवलदार व त्याचा कलेक्टर होमगार्ड इंगळे यांचे कारनामे समोर आले असून, फैजपूर पो.स्टचे तात्कालीन पोलीस अधिकारी वानखेडे हे रजेवर असताना या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात एका गरीब महिलेवर अत्याचार प्रकरणी या बऱ्हाटे नमक हवालदारांनी त्या धनदांडग्या अत्याचाऱ्यांकडून त्यावेळी ७ लाख रुपये होमगार्ड इंगळे या कलेक्टर मार्फत घेऊन गुन्हा दाखल न करता अशा आरोपींना सोडून दिल्याचे खात्रीलायक समजले आहे?तसेच या बऱ्हाटे हवालदारांनी भुसावळ सिटी पो.स्टेला गुरनं.९१/२०१६ या घरफोडी बाबत दाखल गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलांकडून मोबाईल घेऊन स्वतःकडे ठेवून वापरत असताना तपास दरम्यान मोबाईल ट्रेकर्सने पकडून सदरचा महागडा मोबाईल हस्तगत केला.परंतू सदर गुन्ह्यात या हवलदारास आरोपी न करता पोलीस असल्याने वाचवून केवळ त्या दिड वर्ष मुख्यालय जमा करण्यात आले होते.मात्र राजकीय वरदहस्ताने पुन्हा त्यांनी फैजपूर पो.स्टे मिळवला.परिणामी या प्रकरणात अल्पवयीन मुलास बळीचा बकरा बनवून स्वतःक्लीन चिट मिळवली व याबाबत मला क्लीन चिट मिळाली आहे.असे स्वतःआता सर्वत्र सांगत आहे?तरी यामुळे बऱ्हाटे हवालदार पोलीस खात्याची प्रतिमा किती मलीन करीत आहे.आणि आज रोजी तो उजळमाथ्याने मोकाट देखील फिरत आहे.सबब कायदा सर्वांसाठी समान आहे.तर या संपूर्ण घटनाक्रमातून अशांना इतकी सुट का?याबाबत जनतेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या दोघांच्या संदर्भातील सदरील माहिती या गुटका विक्री प्रकरणाबद्दल नुकतेच वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच नागरिकांनी समक्ष भेटून नाव न सांगण्याच्या अटीवर भीत भीत सांगितले आहे.तरी याकडे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी लक्ष देण्याचे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.
होमगार्ड इंगळे यास फैजपूर पो.स्टेने घेतले दत्तक?
याबाबत यंत्रणेतील काही कर्मचारीने नाव न सांगण्याच्या अटीवर इंगळे यांचे थक्क करणारे व आश्चर्याचा धक्का देणारे कारनामे सांगितले.की,होमगार्ड इंगळे हा शासकीय कर्मचारी किंवा पोलीस खात्यात नोकरीस नसताना”विनापगारी पूर्ण अधिकारी” या म्हणी प्रमाणे सदर पोलिस स्टेशनमध्ये मुंशीचे कामकाज करीत असून,एवढेच नव्हे तर तो पोलीस कर्मचाऱ्यांचे ड्युट्या सह हजेरी लावण्याचे काम एका हजेरी मास्टर म्हणून आजही करीत आहे.यासाठी पोलीस ठाण्यात याने बऱ्हाटे हवलदाराच्या शेजारी स्वतःखुर्ची टेबल ठेवून तेथून होमगार्ड इंगळे तथा कलेक्टर हे सर्व कारभार सरासरी ७ वर्षापासून बिनधास्तपणे करीत आहे.व संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा डोळे झाकून मौन बाळगून होते.यामुळे एका प्रकारे त्यास फैजपूर पोलिस ठाण्याने दत्तक घेतल्याचे दिसून येते?सबब फैजपूर पो.स्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हा अधिकार याला कोणी व का दिला आहे?याचीही चौकशी होणार का?तरी याबाबत जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक नखाते,उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नापुर्णासिंग व नवीन रुजू झालेले सपोनि रामेश्वर मोताळे यांनी याकडे जातीने लक्ष घालावे.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.