फडणवीस सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१६२८ कोटी रूपयांचं पॅकेज

0

मुंबई । महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात पावसाचा प्रचंड मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह घरं, जनावरं अन् विहिरीचं मोठं नुकसान झाले. तसेच शेतीही खरडून गेली. या नुकसानीनंतर अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी मदतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.

शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज आहे. या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500 रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. बागायती शेतीला 32500 रुपयांची मदत केली जाणार आहे.

राज्य सरकारकडून मदत
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खास पॅकेज जाहीर.
तत्काळ मदत म्हणून १० हजार रुपये तसेच गहू तांदूळ देण्यात आले.
पडलेली घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद.
डोंगरी भागातील घरांना दहा हजार अधिकची मदत.
नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला मदतीची तरतूद.
NDRF चे निकष काही प्रमाणात काढून टाकले आहेत.
४७ हजार एकरी खरवडून गेलेल्या जमिनींना मदत.
दुकानदार, गोठ्यांना, दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपयांपर्यंत प्रति जनावर, अशा प्रकारची मदत.
प्रति विहीर ३० हजार रुपये.
खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रूपये, तसेच नरेगाच्या माध्यमातून हेक्टरी ३ लाख रूपये दिले जाणार.
रब्बी पिकासाठी बियाणे अतिरिक्त प्रति हेक्टरी ६१७५ कोटी.
विमा असलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांना १७ हजार हेक्टरी मदत.
कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजार तर बागायतीला ५० हजारपर्यंत मदत मिळेल.
पीकविमा किमान पाच हजार कोटी.

शेतकऱ्यांचं किती नुकसान?

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान.
ग्रामिण भागातील घर, गोठे, जनावरांचे नुकसान.
शेतात चिखल. जमीन खरडून गेली. रब्बीची पेरणी करायची स्थिती राहिली नाही.
६८ लाख ६९हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान.
राज्यात एक कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर पिकाची लागवड झाली होती. त्यापैकी ६९ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.