लक्ष द्या ! भुसावळमार्गे धावणाऱ्या या पाच गाड्यांच्या वेळेत बदल

0

जळगाव । भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यात अमरावती-पुणे हुतात्मा एक्सप्रेस, सीतापूर-एलटीटी, जबलपूर, मुंबई गरीबरथ, पुणे-अंजनी हमसफर एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेसचा समावेश आहे.

११०२५ पुणे-अमरावती हुतात्मा एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर रात्री ८.३० वाजता येऊन ८.३५ वाजता सुटणार आहे. ही गाडी पूर्वी ८.४० वाजता येत होती. ११०२६ अमरावती ते पुणे हुतात्मा एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर पहाटे (मध्यरात्री) २.२० वाजता येऊन २.२५ वाजता सुटेल. पूर्वी ही गाडी २.३५ वाजता येऊन २.४० वाजता सुटत होती. ही गाडी जळगाव स्थानकावर रात्री २.५० वाजता येऊन दोन मिनिटांत सुटेल.

ही गाडी पाचोरा स्थानकावर ३.२३, कजगाव ३.४४, चाळीसगाव ३.५८ वाजता येईल. प्रत्येक स्थानकांवर दोन मिनिटांचा थांबा असेल. तसेच १२१०७ सीतापूर-एलटीटी एक्सप्रेस नाशिक स्थानकावर सायंकाळी ५.४७ येऊन ५५० वाजता सुटेल. २२१२३ पुणे-अजनी हमसफर एक्सप्रेस नांदुरा स्टेशनवर रात्री ११.४४, अकोला येथील रेल्वे स्थानकावर रात्री १२.४५ वाजता येऊन दोन मिनिटांनी सुटणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.