पारोळा तालुक्यातील म्हसवे येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
एरंडोल :- पारोळा तालुक्यातील म्हसवे येथे आज विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष चतुरभाऊसाहेब पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, मा.अध्यक्ष विजुआबा पाटील, शेतकी संघाचे संचालक साहेबरावदादा पाटील, मोहाडी मा.सरपंंच रामचंद्रआबा पाटील, लोणीसिम सरपंंच डॉ.कैलास पाटील, सांगवी येथील नथाबापु पाटील, म्हसवे दत्तुआप्पा पाटील, बाहुटे येथील मनोहर पाटील सर यांचेसह म्हसवे व पंचक्रोशीतील गावांचे ग्रामपंचायत, विकासोचे, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, शिवसेना, युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
आज म्हसवे गावाचा सर्वांगीण विकासासाठी आपण तेली समाज सभामंडप, गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर विद्युतीकरण, गावांतर्गत बंदिस्त गटार, काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, पाणी पुरवठा योजना, चौक सुशोभीकरण, स्मशानभूमी पोहोच रस्ता, तलाठी कार्यालय यासह पायाभूत सुविधा व मुलभूत सुविधेची कामे मंजूर आहेत. यातील पूर्ण झालेल्या कामांचे आज आपण लोकार्पण करीत आहोत, सुरु होणाऱ्या कामांचे भूमिपूजन करत आहोत तर इतर मंजूर कामांचा प्रशासकीय बाबी लवकरच पूर्ण करून ती देखील आपण सुरु करणार आहोत. आत ०१.०९ कोटींची कामे पूर्ण झाली तर ६२ लक्ष रुपयांचा कामांचे भूमिपूजन होत आहे. गेल्या वेळीच्या विधानसभा निवडणुकी अगोदर आपल्या म्हसवे गावातील तेली समाजाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सभामंडप मंजूर करून देण्याचे ठोस आश्वासित केलेले होते.
आज त्या दिलेल्या आश्वासनाची २५ लक्ष रुपयांचा तेली समाजाला सभामंडप बांधकाम करणेचा कामाचे आपण भूमिपूजन आज केले आहे. येत्या काही महिन्यात हे काम पूर्णत्वास देखील पूर्णत्वास येऊन तेली समाजाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या प्रमाणे आपण दिलेल्या वचनांची पूर्ती यापुढे देखील आपण अशीच करणार आहोत. गेल्या वेळीच्या विधानसभा निवडणुकीत म्हसवे गणाने मला मतदानरुपी शुभाशिर्वाद देण्यात कुठलीच कसर सोडली नाही, यात आजवरचे सर्वच रेकॉर्ड मोडीस काढले. या दिलेल्या शुभाशिर्वादाची परतफेड या जन्मी तरी शक्य नाही. परंतु माझ्या सर्वोतोपरी प्रयत्नांतून मी आपण दाखविलेल्या विश्वासाला खरे उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी या उपस्थित माय-बाप जनतेला आश्वासित केले व सर्वांचे आभार मानले.