वलाना येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवले
सेनगांव | तालुक्यातील वलाना येथील गायरान गट क्रमांक 577 या जमिनीवर अनअधिकृतरित्या अनेकांनी गेल्या काही काळापासून अतिक्रमण करून ताबा करण्यात आला होता तर दिनांक 31 जुलै सकाळी बारा वाजता महसूल विभाग व पंचायत समिती पोलीस प्रशासनाच्या संरक्षणात मोजणी द्वारे गायरान जमीन गट क्रमांक 577 वरील हद्द कायम करून सदरील गायरान गट क्रमांक 577 ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यात आली
यामध्ये वृक्ष लागवड गावच्या ईतर उपयोगासाठी मोकळी करण्यात आली आहे यासाठी सरपंच संघटनेचे जिल्हा समन्वयक व वलाना ग्रामपंचायत चे सरपंच डॉ .देवानंद गोरे ग्रामसेवक श्री गाढवे तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच व सर्व सदस्य महसूल विभागाचे कर्मचारी , गावातील पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व संघटना व पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड हिंगोली