दिनो मोरियानं तोंड उघडलं तर.. ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा सभागृहात मुंबई आणि विकासकामांबाबत बोलताना नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता?’ दिनो मोरियानं तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी दिला.
मिठी नदीतला गाळ काढण्याचा कंत्राट देताना मराठी माणूस नाही दिसला का, असा प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवार निशाणा साधला. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपांवर त्यांनी उतर दिले. रस्ते काँक्रीटकरण केल्यानंतर त्यात 25 वर्षे दुरुस्ती करावी लागत नाही.
मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचे पांढर करून, त्यामध्ये दुरुस्तीची कामे काढून पैसे लुबडण्याचे काम कोण करत होत? आम्ही तर डीप क्लीन ड्राइव्हने रस्ते धुवायाला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. शिंदे म्हणाले, बोलायला आम्हाला पण येत मिठी नदीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? यांना डिनो मोरिया दिसला, मराठी माणूस नाही दिसला का? आता त्या मोरियाने तोंड उघडल तर कितीतरी लोकांचा मोरया होईल असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.