राजकीय घडामोडींना वेग !एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, आज दुपारी अमित शाहांची घेणार भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी पोहचले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी दिल्ली दौरा केला होता. आज ते दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या राहत्या घरी दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार असल्याचे समजते. या बैठकीदरम्यान राज्यातील राजकारणावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि युतीतील जागा वाटपाबाबत तसेच शिवसेनेच्या नाराजीविषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही नेत्यांविषयीच्या नाराजीचा सूर ही निघू शकतो. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लक्षात घेता, त्याचीही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर राज्यातील राजकारणात बदल होतात का? याची चर्चा सुरू आहे.
टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं
उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण ते कोणाला भेटणार याची मला कल्पना नाही परंतु दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की जे शिंदे यांच्यावर दिल्ली आहेत मध्ये असल्यावर टीका करतात ती मंडळी देखीलच दिल्लीमध्ये आहेत आणि ते राहुलजी गांधीं बरोबर जेवणार आहे त, अशी सुद्धा बातमी आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आत्म चिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जी UBT काँग्रेसच्या तालावर आणि काँग्रेसच्या आदेशावर दिल्ली बंद चालते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची काही आवश्यकता नाही, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. आज जर मी असं म्हटलं की पूर्ण UBT काँग्रेसच्या ध्येयधोरणावर आधारित आहेत आणि राहुल गांधी चालवतात तर ते योग्य ठरणार आहे का आणि म्हणून दुसऱ्यावर टीका करताना विचार करून केली पाहिजे, असा टोला सामंत यांनी लगावला.