सस्पेन्स संपला एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई । विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता जवळपास १३ दिवसांनी नव्या सरकारचा आज शपथविधी होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही हे गुलदस्त्यात होते. अखेर एकनाथ शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला आहे.
एकनाथ शिंदे अखेरीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालंय. शपथ घेण्याविषयीचे पत्र घेऊन ते राजभवनावर जाणार असल्याचं माहिती गुलाबराव पाटील यांनी दिलीय.