एकनाथ खडसेंची भाजपवर जहरी टीका, म्हणाले पाईप चोर, गुंडांना उमेदवारी…
जळगाव । महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावचे राजकारण तापलं असून सत्ताधारी नेते आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिपण्णीसह आरोप-प्रत्यारोप करत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधील इनकमिंगवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे.
जळगाव मनपा निवडणुकीआधी अनेक नेते, पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यावरूनच खडसेंनी टीका करत म्हणाले की ज्यांच्यावर गुन्हा आहे अशांना मत द्या असं महायुती म्हणायला लागली आहे, कुणी पाईप चोर आहे. कुणी जेलमधून निवडणूक लढवत आहे.” अशी जहरी टीका त्यांनी केली.
जुन्या जाणत्या नेत्यांवर कुणाचा प्रचार करण्याची वेळ आली आहे, हे त्यांचं दुर्देव असल्याची टीकाही खडसेंनी केली. जुनी भाजप आणि नवीन भाजपमधील फरक अधोरेखित करताना खडसे यांनी माजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवणही ताजी केली. काय म्हणाले खडसे?
शेकडो गुंडांना उमेदवारी
माझा अर्धा आयुष्य मी भाजपमध्ये काढलं पण त्या कालखंडामध्ये एमआयएम सोबत भाजपची युती कधी नव्हती.इकडे भांडतात आणि तिकडे एमआयएम सोबत युती करतात अशी स्थित नव्हती, असे खडसे म्हणाले.इकडे पाहिलं तर सकाळी सकाळी काँग्रेस सोबत भांडतात टीका करतात आणि तिकडे अंबरनाथ मध्ये पाहिलं तर काँग्रेस सोबत युती करतात. काँग्रेसचे 12 नगरसेवक एका रात्रीत भाजपने फोडले. तर काय सरकार बनवायचे. मुंबई असेल ठाणे, नाशिक असेल त्यामुळे महानगरपालिकांमध्ये चित्र काय आहे. निष्ठांवंत कुठे गेले असा सवाल खडसेंनी केला. भाजपनं अशा शेकडो गुंडांना यांनी महाराष्ट्रामध्ये उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला.