‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळात मंजुरी

0

नवी दिल्ली । भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आल्यामुळे आता सरकार पुढच्याच आठवड्यात हे विधेयक सभागृहात आणण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात जेपीसी स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातील. यानंतर हे विधेयक संसदेत सादर करून पास केले जाईल. तत्पूर्वी, रामनाथ कोविंद यांच्या समितीने सरकारला यासंदर्भात अहवाल सादर केला होता.सध्या देशात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या वेळी निवडणुका होतात. मात्र हे विधेयक पास झाल्यानंतर, एकाच वेळी सर्वत्र निवडणुका घेण्याची तयारी आहे.

मात्र दुसरीकडे ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाविरोधात इंडिया आघाडीने विरोध दर्शविला आहे. मात्र इंडिया आघाडीचा विरोध पाहता या विधेयकाला इतक्या सहजासहजी मंजुरी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ हा भाजपच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी विषय आहे. देशात तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर भाजप ‘एक देश, एक निवडणूक’ हे धोरण पुढे नेईल, याबाबत अंदाज वर्तविले जात होते. हे अंदाज आता खरे ठरण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.