पोलीस पाटलांनी गावात निपक्षपातीपणे काम पाहावे; डीवायएसपी भागवत सोनवणे
शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांचि बैठकीच्या आयोजन शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांनी पोलीस पाटलांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस पाटील गाव पातळीवर पोलीस व महसूल प्रशासनाची महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे यासाठी पोलीस पाटलांनी गावात काम करताना निपक्षपातीपणे व पारदर्शक काम करावे
आगामी सण उत्सव तसेच निवडणुकीत काळात पारदर्शकपणे जबाबदारी पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे कुठलेही काम करताना पोलीस पाटलांनी कुणाची एका पक्षाची व एका गटाची बाजूची बाजू न घेता निपक्षपणे व कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी गावात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावे
डीवायएसपी भागवत सोनवणे शिरपूर
तसेच अनोळखी व्यक्ती आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनचे संपर्क साधून चौकशी करावी पोलीस पाटील पद न्याय तसेच प्रतिष्ठेच असून आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे गावात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रयत्न करावे निवडणूक काळात व सण उत्सवाच्या दरम्यान दोन गटात वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करावे पाटील की व आपल्या पदाची जबाबदारी सांभाळून गावात काम पाहावे यासाठी पोलीस व महसूल प्रशासन आपणास सहकार्य करेन अशी ग्वाही डीवायएसपी भागवत सोनवणे यांनी पोलीस पाटील यांच्या बैठकीच्या मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात गोपनीय विभागाचे कुणाल फुल पगारे पीएसआय ठाकरे व पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील भडणे येतील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी शिवाजी पाटील डॉ महेंद् पाटील बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते