डॉ. सदानंद भिसेंनी घेतला जीएमसीच्या अधिष्ठाता पदाचा पदभार

0

जळगाव,(प्रतिनिधी)– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील नूतन अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी आज दिनांक २१ रोजी पदभार घेतला आहे.डॉ. गिरीष ठाकूर यांच्या बदलीचे आदेश काल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यांच्या जागी डॉ. सदानंद भिसे यांना अधिष्ठाता म्हणून शासनाने नियुक्तीचे आदेश दिले.

सदानंद भिसे यांनी स्वतःच्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या संभाळून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा असे शासन आदेशात म्हटले आहे. डॉ. गिरीष ठाकूर यांनी त्यांच्या प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग या मुळ नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.