डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनी लागला निकाल

0

पुणे । अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने तब्बल ११ वर्षांनी निकाल दिला. या प्रकरणात न्यायालयाने दोन आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून सबळ पुराव्याअभावी तीन आरोपींची मुक्तता निर्दोष मुक्तता करण्यात आली.

विरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुकत्ता करण्यात आली आहे. विरेंद्र तावडे यांने कटकारस्थान रचल्याचा आरोप होता. वकील संजीव पुनाळेकरने शस्त्र नष्ट करण्याचा आरोपींना सल्ला दिला होता तसच विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. दोषी ठरवण्यात आलेले सचिन अणदुरे आणि शरद कळसकर हे खुनाच्या 302 कलमातंर्गत दोषी ठरले. त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झालीय. 5 लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.

कशी झालेली हत्या?
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.