कुष्ठरोगी बांधवांसाठी संवेदना फाउंडेशनची दिवाळी ! पनवेलच्या शांतीवनात सहभोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप

0

मुंबई । भारतीय सैन्य दलातील शौर्यचक्र विजेते युद्धवीर मधुसूदन सुर्वे आणि लेफ्टनंट कर्नल संतोष मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शांतीवन येथील कुष्ठरोगी आणि वृद्ध बांधवांसमवेत सहभोजन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच महिलांना साडी वाटप करून संवेदना फाउंडेशन तर्फे शनिवारी मोठया उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली.

संवेदना फाउंडेशन तर्फे गेली १९ वर्ष कुष्ठरोग निवारण समिती, नेरे पनवेल येथे दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, माजी पोलीस निरीक्षक अविनाश सोनकर, कस्टम अधिकारी सत्यवान रेडकर, कुष्ठरोग समितीचे समाजकार्यकर्ता संतोष ढोरे, संवेदना फाउंडेशन अध्यक्ष विनोद चाळके, ॲड. रंजना खोचरे, गायक किशोर गवांदे, पोलीस निरीक्षक रवींद्र दुशारेकर, सिने अभिनेती ईश्वरी शेट्ये, अभिनेता
मितेश आगणे, सहारा अकादमीचे एस पवार, शांतीवनचे सीईओ नंदकुमार उरणकर,समाजसेवक एकनाथ भिसे, राजेन्द्र वोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भारतीय सैन्य दलातील शौर्यचक्र विजेते युद्धवीर मधुसूदन सुर्वे आणि लेफ्टनंट कर्नल संतोष मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव करण्यात आला. तसेच शांतीवनमधील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आणि महिलांना दिवाळीनिर्मित साडीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार श्रीकांत जाधव यांनी केले. त्यानंतर कुष्ठरोगी बांधवांसमवेत सहभोजनाने दिवाळी साजरी करण्यात आली. तसेच करुनेश्वर वृद्ध आश्रमातील बांधवांना भेट देऊन त्यांच्या समवेत गाणी गाऊन दिवाळी साजरी करण्यात आली.

त्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अमोल खैरे, अशोक राजपुरोहित, कमलेश कुबल, कुष्ठरोग समितीचे संतोष ढोरे, ईश्वर आणि करुणा ढोरे यांनी अथक परिश्रम घेतले. या दिवाळी कार्यक्रमासाठी मुंबई सह दापोली मंडणगड आणि रत्नागिरी येथून मोठ्या संख्येने संवेदना फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीकांत जाधव 9167952092

Leave A Reply

Your email address will not be published.