जळगावच्या सुवर्णनगरीत धनत्रयोदशीच्या दिवशी सोने ३००० रुपयांनी तर चांदी ५००० रुपयांनी घसरली

0

जळगाव । आज, १८ ऑक्टोबर रोजी भारतात धनतेरसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी हा सण येतो आणि सोने, चांदी आणि धातूची भांडी खरेदी करण्यासाठी हा एक शुभ काळ मानला जातो. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने दरात ३००० रुपयाची तर तर चांदी दरात किलोमागे 5000 रुपयांची घसरण झाली आहे.

धनत्रयोदशी निमित्त जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. जळगावच्या सराफ बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोने दरात ३००० रुपयाची घसरण होऊन ते विना जीएसटी एक लाख 28 हजार 300 रुपयांवर आले आहे तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 70 हजार रुपयांवर आले आहेत. यामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे दर १ लाख ३० हजारांवर जातील. हे दर आज जरी कमी झाले असले तरीही ते वाढण्याची शक्यता आहे.

सोने चांदीचे दर काहीसे कमी झाले असले तरी येत्या काळात मात्र सोने आणि चांदीचे दर वाढत राहतील अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. सोन्याचे दर जवळपास १ लाख ३० हजार रुपये झाला आहे. तरीही ग्राहकांनी आज सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.