धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा

0

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. धनंजय मुंडेंचे पीए मुंडेंचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम दिला. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडेंवर आरोप होत होते. आज विधीमंडळ सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला.

स्वत: सागर बंगल्यावर ने येता त्यांनी आपल्या पीए प्रशांत जोशीद्वारे मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याची प्रतिक्रिया दिली होती. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर काही वेळात मुंडे यांचे पीए प्रशांत जोग हे सागर बंगल्यावर येत मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा दिलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल आदी उपस्थित होते. धनंजय मुंडेदेखील या बैठकीसाठी उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. याच बैठकीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा रात्रीच लिहून घेतला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले. राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंडेंचा राजीनामा पीएकडून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत त्याबाबत घोषणा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.