धामणगाव येथे हिवताप प्रतिरोध महिन्यांतर्गत जनजागृती
धामणगांव ता. जळगांव :- जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत असतो. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात तसेच ता. आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे व ता. हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव तालुक्यात तर प्रा. आ. केंद्र धामणगांव येथे आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी यांचे मार्गदर्शनाखाली हिवताप प्रतिरोध महिना राबवून जनजागृती करण्यात येत आहे.
मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रा. आ. केंद्रात आरोग्य कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. यात वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ, डॉ. अभिषेक ठाकूर, ता. हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन व आरोग्य सहाय्य्क राजेंद्र बारी यांनी माहिती देवून मार्गदर्शन केले.
आगामी काळात हिवताप, डेंगी ताप, चिकुनगुनिया, व हत्तीरोग या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना, घ्यावयाची काळजी व कार्यवाहीबाबत चर्चा केली. यावेळी डॉ. अभिषेक ठाकूर यांनी ह्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाबरोबर जनतेचा सहभाग असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या आजारांवर आपण नियंत्रण मिळू शकत नाही. असेही ते म्हणाले.
प्रा. आ. केंद्र धामणगांव कार्यक्षेत्रातील गावात पाण्याचे कंटेनर, डास उत्पत्ती स्थाने, याची पाहणी केली. तसेच धामणगाव येथे गप्पी मासे पैदास केंद्र कार्यान्वित करून डास उत्पत्तिस्थानात गप्पी मासे सोडण्यात आले. व स्थानिक नागरिकांशी संवाद साधून हिवताप, डेंगी ताप, व चिकुनगुनिया या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला कोरडा दिवस पाळावा, दैनंदिन पाण्याच्या वापराकरिता घरामधील व घराबाहेरील टाकी आठवड्यातून एक वेळेस पूर्णपणे रिकामी व घासून-पुसून स्वच्छ करून पुन्हा भरून झाकून ठेवावी तसेच इमारतीच्या गच्चीवर व परिसरात टायर, नारळाच्या करवंट्या व इतर पाणी सासेल अशा टाकाऊ वस्तू ठेवू नयेत. त्यांची विल्हेवाट लावावी. गावालगतच्या नाल्या मधील पाण्यात गप्पी मासे सोडावे इ. बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी ता. हिवताप पर्यवेक चंद्रशेखर महाजन, आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, डी. सी. सपकाळे, आरोग्य सेवक निलेश पाटील, अमित अहिरे, घनश्याम लोखंडे, सतीश अजलसोडे, मयूर पाटील, सुनील कोळी, जयश्री कंखरे, व संगीता घेर आदी सहभागी होते.