धर्मसेवक नानजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांच्या सौजन्याने कचरावेचक महिला व बालकांना तीर्थक्षेत्रांचे दर्शन
कल्याण । भिवंडी येथील डम्पिंग ग्राउंड वर आदिवासी महिला आपल्या मुलांसोबत कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करीत असतात कुठल्याही प्रकारची शासकीय मदत त्यांना मिळत नाही कचरा वेचत असताना सोबत मुलांना घेऊन जातात अशा मुलांसाठी नवजीवन लोकविकास संस्था वीस वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचे काम करीत आहे
अतिशय उत्कृष्ट अशा या कामाची पोस्ट पावती म्हणून धर्मसेवक नानजीभाई यांनी तेथील कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले होते कचरा वेचक महिला आणि तेथील कर्मचाऱ्यांचा सत्कार करणारा महाराष्ट्रातील पहिला थोर पुरुष त्यांनी तेथे न थांबता तेथील महिलांसाठी विशेष तीर्थ यात्रेची व्यवस्था करून दिली.
100 महिलांना देहू आळंदी व मनशक्ती केंद्र लोणावळा येथे सहलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये सकाळी नाश्ता दुपारचे – रात्रीचे भोजन या सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आयुष्यात कधीच तीर्थक्षेत्राला न जाणाऱ्या महिलांनीदानशूर व्यक्तिमत्व डॉक्टर नानजीभाई (ठाणावाला)आशीर्वादाने दोन वेळा सतत तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले आणि तृप्त झाले या कार्यक्रमाचे आयोजन नवजीवन लोकविकास संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी केले त्यामध्ये पूजा ठोकले उषा वाघमोडे सागर उंडे सीमा इरफान बेगम मेघना मोरे व मंजू मॅडम यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब भोसले व किशोर पाटील यांनी मेहनत घेतली