राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मुंबई । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींच्या गाठी भेटी वाढल्या असून अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याच माहिती मिळाली आहे.
त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले असून महाराष्ट्र्र्राच्या राजकारणात वेगवेगळे अंदाज वर्तवले जाऊ लागले. राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणार की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार, याची जोरदार चर्चाही सुरू झाली आहे.
दरम्यान पुढील काही दिवसांत बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. त्याचीच लिटमस चाचणी म्हणून बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र उतरले होते. पण त्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.