दिल्लीमध्ये भाजपची जोरदार मुसंडी ; ‘आप’च्या सत्तेला सुरूंग

0

नवी दिल्ली । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होताना दिसत असून आपच्या सत्तेला सुरूंग लावण्यास भाजपला यश आले आहे. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी 3186 मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आपच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच मनीष सिसोदिया यांचाही पराभ झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.