टँकरमधून पुष्पा स्टाईलने दारुची तस्करी, कांड पाहून पोलीस हैराण! ५६ लाखाचा साठा जप्त

0

धुळे : खाद्यतेलाच्या टँकरमधून अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५६ लाखांच्या दारुसह एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी टँकर चालकाला अटक केली असून ही कारवाई पुष्पा या गाजलेल्या सिनेमाच्या स्टाईलच्या तस्करीत करण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

याबाबत असे की, धुळे स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, हरियाणातून गुजरातकडे जाणाऱ्या एका खाद्यतेलाच्या टँकरमधून विदेशी दारूची मोठी खेप नेली जात आहे. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि नरडाणा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मुंबई-आग्रा महामार्गवर नाकाबंदी केली.

यावेळी आकांक्षा हॉटेच्या पुढे टपरीजवळील मोकळ्या जागेत पथकाने संशयित जीजे-१२ बीव्ही- ५०१५ क्रमांकाचा २२ टायरचा टँकर अडवला. टँकरचा चालक मोहनलाल पुरखाराम जाट (वय २५, रा. बाडमेर, राजस्थान) याची चौकशी केली असता, त्याच्या बोलण्यावर संशय आल्याने टँकरची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान टँकरमधील तस्करीचा प्रकार पाहून पोलिसांना धक्काच बसला. टँकरमधील सहापैकी चार कप्प्यांमध्ये तब्बल ४०० बॉक्स विदेशी दारू आढळून आले. ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणेच टँकरमध्ये खास कप्पे तयार करून ही दारू लपवण्यात आली होती.कारवाईत ऑल सिझन रेअर कलेक्शनचे तीन हजार ५४० बाटल्या, रॉयल चॅलेंजच्या ८४०, रॉयल स्टॅक क्लासिक व्हिस्कीच्या ४२० अशा एकूण चार हजार ८०० मोठ्या आकारातील बाटल्या जप्त केले आहे. कारवाईत ५५ लाख ९६ हजार २०० मद्दसाठा तर ४५ लाखांचा मिळून आला.

आरोपीवर गुन्हा दाखल
आरोपी चालक मोहनलाल जाट याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात नरडाणा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम बुधवारी रात्रीपर्यंत सुरू होते. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, नरडाणाचे सहायक निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक चेतन मुंडे, पोलिस अंमलदार पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकुर, राहुल सानप, मयुर पाटील, नरडाणाचे ललीत पाटील, रविंद्र मोराणीस, राकेश शिरसाठ, योगेश गिते यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.