मोठी बातमी! भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक, प्रवासी धास्तावले

0

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजवर दगडफेक करण्यात आली आहे. ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास ही दगडफेक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

मात्र, या घटनेमुळे प्रवासी चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान, या दगडफेकीचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की अमळनेरजवळ शेकडो नागरिक जमले असून ते पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करताना दिसून येत आहेत. त्याचवेळी ट्रेनमधील प्रवासी आरडाओरड करीत आहेत.

ट्रेन अत्यंत संथ गतीने गतीने पुढे जात आहेत. प्रवासी महिला आरडाओरड करताना दिसून येत आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला की नाही याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. सर्वसामान्यांचं वाहतुकीचं साधन म्हणून या ट्रेनची ओळख आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.