CNG च्या किंमतीत वाढ, प्रति किलोसाठी किती रुपये मोजावे लागणार?

0

नवी दिल्ली । जागतिक पातळीवर सुरु असलेल्या युद्धामुळे सर्व देशांवर परिणाम होत आहेत. एलपीजी आणि पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आता सीएनजीच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. कारमध्ये लागणाऱ्या सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. टोरेंट गॅसने सीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, जयपुरमध्ये टोरेंस गॅसने सीएनजीच्या किंमती २.५० रुपये प्रति किलोग्राममागे वाढल्या आहेत. त्यामुळे आता सीएनजीच्या नवीन किंमती ९३.४१ रुपये झाल्या आहेत. हे नवीन दर ३ एप्रिल २०२६ पासून लागू आहेत. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी टोरेंस गॅसच्या इंधनाचे पंप आहेत. या पंपावर किंमती वाढल्या आहेत.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सीएनजीच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. सर्वात जास्त फटका तर ऑटोरिक्षा चालकांना बसणार आहे. सीएनजीच्या किंमतीदेखील वाढत असल्याने वाहनचाकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

इतर राज्यांमध्ये सीएनजीच्या किंमती किती?
महाराष्ट्रात सीएनजीचे दर ९४.५ रुपये प्रति किलोग्राममागे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सीएनजीच्या किंमती ९३.५० रुपयांपासून ते ९६.२५ रुपयांपर्यंत आहेत. पंजाबमध्ये सीएनजी गॅसची किंमती ७१.७५ रुपयांपासून ते ९४.२५ रुपये झाले आहेत. तेलंगणामध्ये सीएनजीच्या किंमती ९९ रुपये आहेत.

सीएनजीच्या किंमती वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. रिक्षाचालकांना सीएनजीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळेच त्यांचे बजेट कोलमडणार आहेत. यामुळे रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.