धक्कादायक ! जळगाव शहरात आईची मुलीसह आत्महत्या
जळगाव । शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. घरी कोणीही नसताना पोटच्या मुलीला गळफास देत आईनेही स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना व्यंकटेशनगरमध्ये घडली. सोनाली दीपक दाभाडे (३६, रा. व्यंकटेशनगर) व तेजस्विनी दीपक दाभाडे असं मृतांचे नाव आहे.
दुपारी महिलेचे पती दीपक दाभाडे हे घरी परतले व दरवाजा उघडताच त्यांना पत्नी व मुलगी तेजस्विनी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. हरिविठ्ठलनगर परिसरातील व्यंकटेशनगरमध्ये दीपक दाभाडे हे तिसऱ्या मजल्यावर राहतात. भुसावळ येथे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने रविवारी सकाळी ते आपल्या दोन भावांसह गेले होते. त्यावेळी घरी दीपक यांच्या पत्नी सोनाली व मुलगी तेजस्विनी होती. घरात कोणीही नसताना सोनाली यांनी आठ वर्षीय मुलीला छताच्या पंख्याला दोरीने गळफास दिला व स्वतः देखील दुसऱ्या दोरीने गळफास घेतला.
मोठी मुलगी होती बाहेर लग्नानंतर काही वर्ष अपत्य होत नसल्याने दीपक यांनी मोठे भाऊ जितेंद्र यांची मुलगी काव्या हिला दत्तक घेतले होते. त्यानंतर दीपक व सोनाली या दाम्पत्याला मुलगी झाली. रविवारी ही घटना घडली त्यावेळी काव्या खालच्या मजल्यावर खेळत होती. पत्नी व मुलीने गळफास घेतल्याचा मोठा धक्का दीपक यांना बसला व त्यांचा रक्तदाब कमी झाला होता.