प्रेमविवाह केल्याचा राग; बापानेच मुलीला गोळी झाडून संपवले ; चोपडा शहरातील घटना
चोपडा । प्रेमविवाह केलेल्याच्या रागातून आरपीएफच्या निवृत्त जवानाने आपल्या मुलीवर भर लग्नात घुसून गोळीबार केला आहे. या हल्ल्यात मुलगी ठार झाली आहे. तर जावई गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा या ठिकाणी घडली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर लग्नात आलेल्या वऱ्हाडींनी गोळीबार करणाऱ्या बापावर हल्ला करत त्यालाही गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.
तृप्ती अविनाश वाघ (२४) असे मृत कन्येचे नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (२८, दोधे रा.करवंद, शिरपूर, ह. मु, कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. आरोपी सासरा किरण अर्जुन मंगले (४८, रा.शिरपूर) याला हा विवाह पसंत नव्हता. बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडलाच आले होते.
दोन वर्षापूर्वीं अविनाश व तृप्ती यांचा प्रेमविवाह झाला होता. यातच अविनाश याच्या बहिणीची हळद दि २६ रोजी चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकरनगर येथे होती. त्या निमित्ताने ते चोपडा येथे आले होते. त्यात तृप्तीने प्रेम विवाह केल्याचा राग वर्डील निवृत्त सीआरपीएफ किरण अर्जुन मंगले यांच्या मनात होता. (वय ४८राशिरपूर जि धुळे) ते चोपडा येथे हळदीच्या ठिकाणी आले. त्यात त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.
हळदीचा कार्यक्रम आटोपल्या नंतर किरण आणि तृप्ती हे समोरासमोर आले. तृप्ती हिला पाहताच किरण याने त्याच्याकड़ील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला असतातोही गोळी लागून जबर जखमी झाला.अविनाश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला हलविण्यात आले आहे. नातेवाईकांनी किरण मंगले यास मारहाण केली. दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिसअधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. भर हळदीच्या कार्यक्रमांमध्ये मुलीवर किरण मंगले याने मुलीवर गोळ्या झाडून टाकली हळद कार्यक्रमात व्यक्ती आणला म्हणून याला जबरदस्ती झाला असल्याने त्याच्यावर देखील रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहे.