मी जास्त बोलण्यापेक्षा माझं काम अधिक बोलतं – मंत्री छगन भुजबळ
विकासाची कामे करतांना आपण कधीही धर्म आणि जात पाहिली नाही - मंत्री छगन भुजबळ
नाशिक :- येवला विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहे. ही विकासकामे करतांना कुठल्याही समाजावर अन्याय आपण होऊ दिला नाही. तसेच विकासाच्या या कामांमध्ये मी अधिक बोलण्यापेक्षा माझे कामे अधिक बोलतात असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते निमगाव वाकडा व पाटोदा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला नाशिक रस्ता काँक्रीटीकरण ५६० कोटी, लासलगाव विंचूर खेडलेझुंगे रस्त्यासाठी १३४ कोटी, लोनगंगा शिवनदीचे सुशोभिकरण करण्यासाठी प्रत्येकी १३ कोटी ५० लाख, येवला शिवसृष्टी पहिला टप्पा ११ कोटी, मुक्तिभुमी ३० कोटी,लासलगाव उपजिल्हा रुग्णालय १३.५० कोटी यासह कोट्यावधी रुपयांची कामे मतदारसंघात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, विकासाला कुठलीही जात धर्म आणि पक्ष नसतो. विकासाची ही कामे कुठल्याही जातीचा विचार करून नाही तर सर्व समाजासाठी आपण काम केली आहे. विकासाच्या या कामांबाबत आपल्याला अधिक बोलण्याचे काम नाही. विरोधक मात्र टीका करण्याचे काम करतात. मात्र या मतदारसंघात आपली विकास कामेच सर्व बोलतात आपल्याला बोलण्याचे कामच नाही अशी टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, गेली सतरा वर्ष विशेष प्रयत्न करून मांजरपाडा प्रकल्प पूर्ण केला आहे. गुजरातकडे वाहून जाणारे पाणी बोगदयाद्वारे वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून वळवून आपण ते डोंगरगावपर्यंत आणले आहे. यापुढील काळात अधिक बंधारे वाढवून अधिक पाणी येवल्यात कसे आणता येईल यासाठी लवकरच बैठक घेऊन काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी येवला मतदारसंघातील ९३ हजार महिलांना लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, पालखेड डावा कालव्याच्या माध्यमातून पाटोदा परिसरातील सर्व बंधारे भरून देण्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यांना दिले असून लवकरच हे बंधारे भरले जाऊन पाण्यावाचून कुणीही वंचित राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केली.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
निमगाव येथे प्रादेशिक पर्यटन योजनेतील श्री.रेणुकामाता मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन २ कोटी ९५ लाख,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतील संविधान सभागृहाचे भूमिपूजन २० लाख
तलाठी कार्यालय-निवासस्थान बांधकाम भूमिपूजन – ३० लाख
पाटोदा येथे मंडळ अधिकारी कार्यालय व निवास बांधकाम लोकार्पण – ३५ लाख
कामगार तलाठी कार्यालय व निवासस्थान लोकार्पण – ३२ लाख
तीर्थविकास योजनेअंतर्गत भक्त निवास लोकार्पण – १२ लक्ष लाख
पाटोदा गांव अंतर्गत अल्पसंख्याक निधीमधून रस्ता कॉक्रीटीकरण करणे – १२ लाख
दहेगांव पाटोदा येथे मारुती मंदिरासमोर मुलभूत सुविधा योजने अंतर्गत सभामंडप बांधणे- १२.७२ लाख
२५१५ निधी मधून रस्ता कॉक्रीटीकरण लोकार्पण – १२ लाख
नागरी सुविधा योजने अंतर्गत पाटोदा गाव अंतर्गत २ रस्ते लोकार्पण २० लाख
दहेगांव पाटोदा गाव अंतर्गत नागरी सुविधा योजनेअंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण लोकार्पण – १० लाख
१५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत स्मशानभूमी बांधकाम लोकार्पण – १० लाख
१५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण लोकार्पण – १० लाख
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना रेशनकार्डचे वाटप
मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला मतदारसंघात आदिवासी बांधवांसाठी विशेष रेशनकार्ड शिबिर राबविण्यात येत आहे. या शिबिराअंतर्गत अर्ज केलेल्या आदिवासी बांधवांना मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.