शेतकरी संघटनेच्या तालुका संपर्क प्रमुखपदी चंद्रकांत आडोळे यांची निवड
इगतपुरी ।
शेतकरी संघटनेच्या इगतपुरी तालुका संपर्क प्रमुखपदी चंद्रकांत आडोळे यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील ओझर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत युगात्मा शरद जोशी यांची ८९ वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास आण्णा पवार यांच्या हस्ते इगतपुरीचे चंद्रकांत आडोळे यांना इगतपुरी तालुका संपर्क निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी चंद्रकांत आडोळे यांनी बोलतांना सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेऊन शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यास बांधील राहील.
चंद्रकांत आडोळे यांची तालुका संपर्क पदी निवड झाल्याबद्दल इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या प्रसंगी चंद्रकांत आडोळे यांचे बाळासाहेब धुमाळ, किसन शिंदे, बाळकृष्ण नाठे,लक्ष्मण मते, रामनाथ ढिकले,सोपान कडलग, रामचंद्र मामा बोबले, संतू पाटील झांबरे, केदू पाटील बोराडे, संतू पाटील बोराडे, रामदास गायकर, भागवत भगत महेश मालुजकर, संदीप चव्हाण, वसत चव्हाण, सोनू आडोळे यांनी अभिनंदन केले.