चाळीसगावात हवालदारासह पंटरला लाच घेताना अटक

0

चाळीसगाव । दोन हजाराची लाच पोलीस हवालदाराला भोवली आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाईमध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तसेच त्रास न होऊ देण्यासाठी दोन हजाराची घेताना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी बीट हवलदाराला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय सोबतच त्याच्या पंटरला देखील ताब्यात घेतलं आहे.

चाळीसगाव तालुक्यातील मौजे तरवाडे येथील गावात झालेल्या वादातून एका व्यक्तीने तक्रारदाराविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नंतर वाघळी बीटचे हवलदार जयेश रामराव पवार (वय ५०, रा. गायकेनगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) यांनी तक्रारदाराला त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाईमध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तसेच त्रास न होऊ देण्यासाठी त्यांच्याकडे चार हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदाराने धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. सदर पथकाने चाळीसगाव येथे सापळा रचून हवालदार जयेश पवार यांनी लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये त्यांनी खासगी सुनील श्रावण पवार (वय ५२) यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांना पकडले. संशयित जयेश पवार व सुनील पवार यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.