जळगाव शहरात 15 लाखांची रोकड जप्त; चौकशी सुरू

0

जळगाव ।  जळगाव शहरात नाकाबंदी दरम्यान एका दुचाकी चालकाची तपासणी केली असता त्याच्या बॅगमधे 15 लाखांची रोकड पोलिसांना आढळून आली आहे. या रकमेबाबत सदर इसम समाधान कारक उत्तर देऊ शकला नसल्याने पोलिसांनी ही रक्कम जप्त करत त्याची चौकशी सुरू केली आहे

जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुली जवळ पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान चोपडा तालुक्यातील डि.के. पाटील नामक व्यक्ती बुलेटवरून जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याच्या बॅगची झाडाझडती घेतली असता त्यात तब्बल 14 लाख 85 हजारांची सापडली.

या रोकड संबंधी त्यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता ते व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान डिके पाटील यांनी ही रोकड आपल्या शेतीशी संबंधित असल्याचे सांगितले. संबंधिताला पैशांविषयी व्यवस्थित माहिती न देता आल्यामुळे रोकडा आम्ही जप्त केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.