एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार, पाच गंभीर जखमी
पारोळा । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच भडगाव-पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ एसटी बस आणि खासगी टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत असे की, बुधवार २० ऑगस्ट रोजी पहाटे महामंडळाची एसटी बस (क्र. MH-14-BT-1984) सोयगावहून धुळ्याकडे जात असताना वाघरे गावाजवळ समोरून येणाऱ्या खासगी टेम्पो (क्र. MH-19-CY-1606) या वाहनाशी जोरदार धडकली. या धडकेनंतर बसमधील आणि टेम्पोमधील अनेक प्रवासी जखमी झाले.
या अपघातात मिराबाई पंढरी सोनवणे (५५, सोयगाव), निलाबाई घनश्याम सिरसागर (७५, धुळे), अंजनाबाई रघुनाथ पाटील (७०, हनुमंत खेडा), मनोहर सजन पाटील (६०, चोरवड), रमेश धोंडू चौधरी (८०, भडगाव), मीराबाई रघुनाथ पाटील (८०, धुळे) आणि जानवी संतोष मोरे (१९, धुळे) जखमी झाले असून या जखमींवर पारोळा आणि भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
या अपघातात बसचा समोरील भाग पूर्ण दाबला गेला असून टेम्पो वाहनाचेही मोठं नुकसान झालं आहे.