बोदवड रेल्वे उड्डाण पुलावर खड्डे,निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण,रस्त्याचे काम अपूर्ण
बोदवड | बोदवड रेल्वे उड्डाण पुलाचे डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले होते . मागील वर्षी उद्घघाटण झाल्यावर एक महिन्याच्या आत रस्त्यावर जागी जागी जीव घेणे खड्डे पडले होते. यासाठी बोदवड शिव सेना तालुका प्रमुख प्रमोद धामोडे हे १५ ऑगट्स २०२४ रोजी पुला जवळ उपोषणाला बसले होते.या उपोषणाची दखल घेत प्रवीण आर . बेंडकुळे यानिप्त्रा दिले होते की पोच मार्ग वर खड्डे पडून नादुरुस्त झालेले असल्यानेय कार्यालय मर्फत्तासे विभागाच्या वरिष्ठ कार्यालया मार्फत कंत्राट दारास वेळोवेळी करार नाम्यात अंतर्भूत अटी व शर्ती अन्वये नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.
सदर नोटीसीची दाखल घेत पोच मार्गाच्या दुरुस्तीचे काम कंत्राट दा हाती घेण्यात आले होते.परंतु कंत्राट दारा मार्फत वरील थरांचे काम पावसाळा असल्याने विहित कालावधीत पूर्ण होऊ शकले नाही.त्यामुळे सदरील पोच मार्ग पावसामुळे पुन्हा बाधित झाले.सबब सद्यस्थितीत पावसाळा असल्यामुळें कंत्राटदारास सदरील पोच मार्ग पर्यायी दुरुस्ती करून दैनंदिन वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता सूचित केले आहे.सदरील पोच मार्गाचे वरील थरांचे बांधकाम पावसाळा संपताच तात्काळ हाती घेण्या बाबत विभागामार्फत दक्षता घेण्यात येत आहे.
पोच मार्गाच्या खराब झालेल्या डांबरीकरणाचे काम तसेच इतर अनुषंगिक असे एकूण १३७.०२ लक्ष चे देयक दंडात्मक स्वरूपातअद्याप कंत्राटदारास अदा करण्यात आलेली नाही.असे पत्र देऊन प्रमोद धामोडेला उपोषण पासून प्रवृत्त केले होते.परंतु आज या घटनेला आकरा महिने उलटूनही काम पूर्ण झाले नाही,जे केले आहे तेही निकृष्ट दर्जाचे या रस्त्यावर .पुलावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. अजूनही काम अपूर्ण आहे.सदरचा रस्ता हा बाला जी नगरात आहे की बालाजी नगर रस्त्यात आहे.या ठिकाणी काम अपूर्ण आहे.या रस्त्याची चौकशी करावी म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिले होते.एक वर्ष उलटूनही काम पूर्ण होत नाही,जे काम केले तेही निकृष्ट दर्जाचे एक महिन्याच्या आत उखडून जात आहे.वाहन चालकांची फक्त उड्डाण पुलाची समस्या सुटली खड्ड्यांची समस्या मात्र कायम आहे. २०१९ मध्ये मंजूर झालेल्या कामाचे हे भिजत घोंगडे कधी पर्यंत चालू राहणार ,कधी रस्ता पूर्ण होईल.३८कोटीचा हा पूल व रस्ता आहे
पुलावर डांबरीकरण उखडून जात आहे.खड्डे पडले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त उपोषण कर्त्याची पत्र देऊन मन धरणी केलेली दिसते, निविदेतीलअटी व शर्ती नुसार जर काम पूर्ण होत नसेल तर अटी व शर्ती काढून टाकाव्यात .लोक प्रतिनिधी यांनी याची दखल घ्यावी असे जनतेतून बोलले जाते.