विधानसभेसाठी भाजपकडून पहिले 10 मतदारसंघात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सत्तेत असलेल्या महायुतीमधील जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार असून महायुतीमधील 120 नावांवर अंतिम निर्णय होणार आहे. तत्पूर्वी भाजपकडून 25 उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली असून 10 मतदारसंघातील नावांवर शिक्कामोर्तबही झालं आहे.
या पहिल्या यादीमध्ये जळगाव शहरातून विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांना पुन्हा उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. तर भुसावळमध्येही संजय सावकारे यांना पुन्हा एकदा संधी दिल्याचं समजतेय. तसेच रावेर विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांचे नाव निश्चित झाल्याचं समजतेय.
भाजपकडून 25 उमेदवारांची यादी तयारी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारसंघ निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामध्ये, चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. मात्र, भाजपच्या या पहिल्या यादीतून 6 विद्यमान मंत्र्यांना वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यातच, उमेदवारांच्या नावाची घोषणा पुढील 2 दिवसांत होण्याची शक्यता आहे.
10 मतदारसंघात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?
नंदूरबार – विजयकुमार गावित
नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कोथरुड – चंद्रकांत पाटील
धुळे ग्रामीण – सुभाष भामरे
धुळे शहर – अनुप अग्रवाल
रावेर – हरीभाऊ जावळे
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव – सुरेश भोळे
शहादा – राजेश पाडवी
सिंदखेडा – जयकुमार रावल